skip to main | skip to sidebar

'ऋतुस्पर्श' - श्याम पेठकर.

"मौसम के साथ साथ बदल जाना चाहिये| खुशीयाँ न हो तो फीर गम से बहल जाना चाहीये| जीस रौशनी से आँखे खूल न सके | उस रौशनी से दूर निकल जाना चाहिये |" - अब्बास दाना बडौदी Add to Technorati Favorites

Tuesday, February 5, 2008

भैरुरतन दमाणि पुरस्कार स्विकारतांना श्री श्याम पेठकर यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातील काही अंश.



Collection Displayed By चैतन्य देशपांडे at 5:46 PM 1 comment:
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

"ऋतुस्पर्श" बद्दल थोडेसे...

"ऋतुस्पर्श" हा निसर्गाच्या विविध छटांना उलगडवून दाखवणारा ह्रृदयस्पर्षी, संवेदनशील ललितबंधांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला. 'श्याम पेठकर' हे संवेदनशील मनाची देणगी प्राप्त असलेले; त्यांच्या नाविन्यपूर्ण व सरळ मनाला भिडणार्र्या शैलीमुळे सध्या गाजत असलेलं नाव. श्याम पेठकरांच्या "दमन" आणि "टिप्पारणी" या दोन पुस्तकांप्रमाणेच "ऋतूस्पर्ष" हे देखिल वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे. नागपूरच्या 'विजय प्रकाशन' ने प्रकाशीत केलेले हे पुस्तक सर्व आघाडिच्या पुस्तकालयात उपलब्ध आहे. आपल्या ई-वाचकांसाठी पुस्तकात असलेल्या बावन्न ललितबंधांपैकी निवडक असे काही ललितबंध या ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे. ऋतुस्पर्शचे वाचन सुलभ व्हावे या उद्देशाने या पुस्तकाबद्द्लच्या मान्यवरांच्या प्रतिक्रीया आणि समिक्षणे ईथे देत आहे. पुस्तकाची 'अक्षरओळख' व्हावी, म्हणून हा प्रयत्न. शिवाय वेळोवेळी उपलब्ध असतील त्यानुसार विविध समिक्षणे आणि प्रतीक्रीया या संकेतस्थळावर नोंदवण्यात येतील. आपल्याही प्रतिक्रीया अत्यंत मोलाच्या आहेत्, याबद्दल वादच नाही. कृपया शक्य असेल तोवर लेखाच्या थेट खालीच प्रतीक्रीया नोंदवावी.

'ऋतुस्पर्श' - मुखपृष्ठ

'ऋतुस्पर्श' - मुखपृष्ठ
दोन हातंच्या प्रतिकांतून माणूस, भाषा, आणि स्पर्शातीत ऋतुंचे झंकार एकवटले आहेत

श्याम पेठकर

श्याम पेठकर

श्याम पेठकर.

श्याम पेठकर
श्याम पेठकर हे सध्या तरूण भारत, नागपूर येथे पुरवणी संपादक म्हणून कार्यरत आहेत. कथा, ललितवाडःमय, आणि नाटक हे साहित्यप्रकार अगदी सक्षमपणे हाताळलेले आहेत. त्यांचे पहिलेच नाटक 'रगतपिती' हे राष्ट्रीय स्तरावर National School Of Dramma येथे गौरविले गेले. यानंतर लिहलेल्या 'एक होता माणूस', 'बंदी क्र. सत्तावन्न त्र्याण्णव' सह ईतर नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेत भरघोस यश. व्यावसायिक रंगभुमीवर लवकरच टिंगल टिंगल या नाट्यकृतीद्वारे पदार्पण.
टिव्ही साठी टिकल ते पोलिटीकल या मालिकेचे काही भाग लिहले.
नाटक, सिरिअल्स बरोबरच ललितलेखनात विलक्षण प्रतिभा. निसर्ग हा प्रमुख विषय असलेले हे ललितबंध आपल्याला नक्कीच आवडतील, या खात्रीसह हा ब्लॉगप्रपंच!

श्याम पेठकर

श्याम पेठकर
'ऋतुस्पर्श' ला दमाणी पुरस्कार मिळाल्यानंतर घेतलेले श्याम पेठकरांचे छायाचित्र

खेळीयाचा डाव...

  • ►  2007 (15)
    • ►  May (8)
    • ►  June (4)
    • ►  September (1)
    • ►  December (2)
  • ▼  2008 (2)
    • ▼  February (1)
      • भैरुरतन दमाणि पुरस्कार स्विकारतांना श्री श्याम पेठ...
    • ►  July (1)

ईथेही भेट द्या...

  • चैतन्य देशपांडेच्या विज्ञानकथा
  • Chaitanya Deshpande's world of words...
  • Chaitanya Deshpande's Poetry
  • Chaitanya Deshpande on PurpleDream

प्रिय श्यामभाऊ....

'पानगळ' आणि 'शिशिराचे चाळे' हे दोन ललीतबंध आपल्याला दिल्यानंतर त्यांवर तेव्हाच आलेली ही बोलकी प्रतीक्रीयाही या ठीकाणी नमुद कराविशी वाटते - प्रस्तूत पत्र हे "ऋतूस्पर्श" चे लेखक श्री. श्याम पेठकर यांना उद्देशून नागपुर येथील 'द हितवाद' चे मुख्य उपसंपादक श्री. श्रीनिवास वैद्य, यांनी लिहलेले आहे. "ऋतूस्पर्श" पुस्तकातही प्रस्तावनेऐवजी अधीक बोलक्या अश्या या प्रतीक्रीयेचा समावेश केलेला आहे.
..........
श्री
...........
...........
प्रिय श्यामभाऊ, तुमचे 'पानगळ' आणि 'शिशिराचे चाळे' हे दोन लेख वाचले. आतापर्यंत आपले पोरकेपण झाकून ठेवणारा मी पुरता उघडाबोडखा झालो. ज्या मातीत घाम गाळून मोती पिकवले, तिच्या आठवनीने डोळ्यात आलेले पाणी; कचरा गेल्याचे सांगून डोळे पुसून घेतले. महत्प्रयासाने तळघरात कोंडलेले विरहाचे दुःख हंड्या-झुंबरासारखे लटकविले गेले. एखाद दुसरा हुंदका जिरविता येइल; पण हुंदक्यांच्या कढाचे काय?
..........
मढ्याच्या थंडगारपणासारख्या शहरातील संवेदना मला बधिर करत होत्या; पण तुमच्या लेखनाने गोधडीची उब मिळाली. नियतीनेच बखोटं धरून इथे आणल्यावर भोग भोगणे क्रमप्राप्तच आहे. पण तुमची मैत्री (तुम्हाला मान्य असल्यास), तुमचे लेखन, तुमचा सहवास, या सगळ्यांनी हे माझे भोग सवाष्ण केलेत.
.........
सतरा वर्षे खेड्यात राहून, खर्र्या अर्थाने मातीत राहून शहरात आलो. पण मुळांसकट शहरांत येणे जमलेच नाही.
बोन्साय संस्कृती जपणार्र्या या शहरी लोकांना ना भराटीचा काटा ठाऊक, ना तिच्या फुलांचा रानगंध. जीव गुदमरून जातो ईथे. तुमचे गावाकडचे संदर्भ मग प्राणवायुचा पुरवठा करतात.
.........
पावसाळ्यात शहरात रहायला आलो. ईथल्या काळ्या कुळकुळीत डांबरी सडकांवर कोसळणार्र्या पावसाला जखमी होतांना बघीतले. तेव्हा खेड्यात पडणारा भाग्यशाली पाऊस आठवला. प्रत्येक थेंब आपल्यात सामावून घेऊन मऊशार लोणी होणारी माती आठवली. तिच्या मृदगंधाने चेतवली जाणारी सृष्टी आठवली. अन या शहरात आपले कसे निभायचे, या धास्तीने मन शेवर्र्याच्या कापसासारखे सैरभैर झाले.
.......
इथे तर बी रुजवायलाच जागा नाही, अन कुणाला वेळ नाही. तणकटांनाही प्रसवणार्र्या मातीत आपले आयुष्य घालविणारा मी, या वांझ शहरात तुटलेल्या पतंगासारखा झालो. तुमच्या लेखनामुळे मात्र आता आपल्याला एक सोबती मीळाल्याचा आनंद झाला. सोबती भेटला म्हणजे दुःख वाटले जाते म्हणतात.
........
तरोड्याला आमच्या वाड्याच्या मागेच गढी आहे. तेथील 'सुखाचे गढ्ढे' मी बघीतले आहेत. सोन्याच्या एखाद्या तुकड्यापायी गढीची पांढरी माती सार्र्या आयुष्यावर घेणार्र्या बायाबापड्याही मला माहिती आहेत. मनाच्या एखाद्या कोपर्र्यात भेदरून बसलेल्या माझ्या आठवणींना तुम्ही बोट धरून उठवलेले आहे. १७ वर्षाच्या आठवणींवर इतक्या लवकर पापुद्रा धरावा, याचे आश्चर्य वाटत आहे.
........
मुळे तुटलेल्या एखाद्या लाकडी ओंडक्याचे वृक्षारोपण करावे, तसा मी या नागपुरात रुजतो आहे. तुमच्या लेखनाने त्याला काही अवसान मिळेल, असे वाटते. पालवीही फुटू शकते; परंतू ही नवी पालवी खेड्यातील माझ्या सोनेरी क्षणांना खुणावते की, मलाच फितूर होते कुणास ठाऊक? अधीक काय लिहू?
......
तुमचा श्रीनिवास.
 
Add to Technorati Favorites